पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार   

पूंछ, कुपवाडाला केले लक्ष्य

 
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानाने जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि कुपवाडा परिसराला लक्ष्य केले, असे लष्कराच्या अधिकार्‍यांनी सोमवारी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर चौथ्यांदा गोळीबार केला. २७ एप्रिलच्या मध्यरात्री पाकिस्तानी चौक्यांतून सैनिकांनी छोट्या शस्त्रांनी  गोळीबार केला, असे लष्कराच्या प्रक्त्याने सांगितले. या गोळीबारात भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही ते म्हणाले.पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री तुतमारी गली आणि रामपूर क्षेत्रात गोळीबार केला होता. प्रत्येके वेळी भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles